वास्तुशास्त्र ही ज्योतिषाची एक महत्त्वाची शाखा आहे. ही जमीन, दिशानिर्देश आणि उर्जा या तत्त्वांवर कार्य करते आणि बांधकाम संबंधित गोष्टींच्या शुभ आणि अशुभ परिणामाबद्दल सांगते.वास्तुशास्त्र मध्ये असे म्हटले आहे की वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्येही वास्तू दोष आहेत. वास्तुदोष असताना खुप प्रकारच्या समस्या व्यक्तीला त्रास देतात. त्यांना दूर करण्यासाठी, दिशानुसार वेगवेगळ्या देवतांची उपासना करणे अत्यंत गरजेचे आहे.
असे मानले जाते की घरात जर वास्तु दोष असेल तर सर्वत्र वातावरण नकारात्मक होऊन जाते. प्रत्येक शुभ कार्यात अनावश्यक अडथळे येत राहतात.
दिशा : पूर्व
दोष:
- नोकरी ची समस्या उद्भवते
- पिता – पुत्र यांमध्ये भांडण होतात.
उपाय: पूर्व दिशेचे देव सूर्यदेव मानले जातात. जोतिष मध्ये सूर्यदेव फार महत्वपूर्ण मानले गेले आहेत. रविवार च्या दिवशी सुर्यपुजा केल्याने सूर्य देवांची कृपा भक्कम होते ज्या करणे बल व शक्ती प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते.
सूर्यदेवांची आराधना करण्यासाठी त्यांना जल अर्पित करावे. आदित्त्यास्त्रोत चा पाठ पठण करावा. सूर्य देवांची कृपा तुमच्यावर लाभून राहील.
दिशा: पश्चिम
दोष:
- शनी संबंधी दोष.
- वेगवेगळ्या प्रकारची संकटे येतात.
उपाय: पश्चिम दिशेचे देव शनिदेव मानले जातात. नऊ ग्रहांमध्ये शनी ग्रहाला सर्वात क्रोधी आणि खतरनाक ग्रह मानले गेले आहे. शनी देवांना खुश करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. शनी देव काळया रंगाला अधिक पसंद करतात.अशा रंगाच्या पशुपक्ष्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात शनी मंत्र शनीचालिसा आणि शनी देवांची आरती करावी.
दिशा: उत्तर
दोष:
- पैशांची समस्या उद्भवते.
- वाणी मध्ये दोष येतात.
उपाय: उत्तर दिशेचे देव बुधदेव मानले जातात. सूर्य ग्रहाच्या जवळीक असलेला ग्रह म्हणजे बुध. हिरव्या रंगाच्या वस्तू जवळ ठेवाव्या. श्रीगणेश, दुर्गामाता आणि देव विष्णू यांची पूजा करावी. बुधवारी कण्यापूजन करून हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्या.
दिशा: दक्षिण
दोष:
- क्रोध वाढतो.
- आपापसात भांडण होतात.
- पैशांची समस्या उद्भवते.
उपाय: दक्षिण दिशेचे देव मंगल आणि यमराज मानले जातात. हनुमान चालीसा , हनुमान अष्टकाचा पाठ केल्याने मंगळ ची शांती होते. अन्नदान, वस्त्रदान करावे. प्रत्येक दोन एकादशी येतात. या एकादशी दिवशी व्रत केल्याने दरिद्रता नष्ट होते. जे व्यक्ती शिवलिंगावर दूध प्रधान करतात त्यांच्या आयुष्यातील दुःख दरिद्रता समाप्त होते.
दिशा: ईशान्य कोन
दोष:
- वैवाहिक जीवनात समस्या येतात.
उपाय: या दिशेचे स्वामी ग्रह गुरू आणि शिव मानले जातात. या दिशेतील समस्या दूर करण्यासाठी शंकर देव आणि गौरी मातेची आराधना करावी. उत्तर – पूर्व दिशा स्वच्छ आणि साफ ठेवावी.
दिशा: आग्नेय कोन
दोष:
- भौतिक सुखात कमी राहते.
- प्रेमसंबंध अपुरे राहतात.
उपाय: या दिशेचे देव शुक्र आहेत. या दिशेचे दोष दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि शुक यंत्र स्थापित करुन त्याची नियमित पूजा करावी.
दिशा: नैऋत्य कोन
दोष:
- घरात अशांतता येते.
- आपापसात भांडण होतात.
उपाय: दक्षिण- पश्चिम दिशेला नैऋत्य कोन म्हणतात. या दिशेचा स्वामी राहू-केतु आहे. हा दोष दूर करण्यासाठी भगवान शिव यांना दररोज पाणी द्यावे आणि राहू-केतुसाठी सात प्रकारचे धान्य दान करा.
दिशा: वायव्य कोन
दोष:
- मानसिक तणाव निर्माण होतो.
- प्रजनन संबंधी समस्या येतात.
उपाय: उत्तर – पश्चिम दिशेला वायव्य कोन म्हणतात. या दिशेचे स्वामी चंद्रदेव आहेत. या दिषेपासून होणाऱ्या दोषावर मात करण्यासाठी चंद्रदेव मंत्रांचा जप करुन महादेवाची पूजा करावी.