खिडकी उघडल्यावर उघडेल आपले भाग्य,जाणून घ्या वास्तू संबंधी या चकित करणाऱ्या गोष्टी….
वास्तुशास्त्रानुसार त्या घरात बनलेल्या खिडक्या त्या घराच्या वस्तूला प्रभावित करतात.त्यांचा योग्य दिशेला असल्याने जसे भाग्य उघडते त्याच प्रमाणे त्यांच्या चुकीच्या दिशेला असल्याने त्या विरुद्ध परिणाम होतात व नशिबाची साथ मिळत नाही.
वास्तुशास्त्रानुसार घरात खिडक्यांची दिशा व संख्या योग्य असेल तर जीवन आनंदमय होते व आपली प्रगती होते. परंतु खिडक्या जर चुकीच्या दिशेला असतील तर त्याविरुद्ध परिणाम व्हायला लागतात. घरात आनंदमय वातावरण राहत नाही, प्रसन्नता राहत नाही, घरातील सदस्यांचे वाद-विवाद होतात व आपल्या प्रगतीत अडथळे येत असतात. चला तर जाणून घेऊया घरात खिडक्या बनवत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी.
खिडक्या बनवत असताना त्यांची संख्या सम असायला हवी २,४,६,८ याप्रमाणे. खिडक्या विषम संकेत असणे अशुभ मानले जाते.
वास्तूशास्त्रात खिडक्यायांसाठी योग्य दिशा ठरवली गेली आहे. यानुसार घराच्या पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला असणे लाभदायक मानले गेले आहे. खिडक्या पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेला असल्याने सुख-समृद्धीचे द्वार उघडते.
पूर्व दिशा सूर्यदेवाची देशा आहे या दिशेला खिडक्या अधिक असल्या पाहिजेत. खिडकीतून येत असल्या प्रकाशा सोबतच घरात स्वभाग्य देखील प्रवेश करते. यामुळे परिवारातील सदस्यांना यश मिळते व प्रगती होते.
उत्तर दिशेच्या संबंध धनाचे देवता कुबेर यांच्याशी येतो. त्यामुळे या दिशेला कुबेराची दिशा असे म्हटले जाते. या दिशेत खिडक्या ठेवल्याने धनाची प्राप्ती होते.
दक्षिण दिशेला खिडकी असल्याने रोग व सोकाची संभावना वाढते. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेलेली आहे. या दिशेला खिडक्या बनवणे टाळले पाहिजे. नैऋत्य कोन्यातही खिडकी नसली पाहिजे. या दिशेला खिडक्या बनवायचे आवश्यक असेल तर त्यांना कमीत कमी उघडा.
वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.