घरात झाडू मारताना या गोष्टीची घ्या काळजी अन्यथा घरात आर्थिक समस्या सुरू होतात व लक्ष्मी अस्थिर होत असते!
ज्या व्यक्तींना केरसुनिचा योग्य प्रकारे उपयोग करता येत नाही अशा व्यक्तींच्या जीवनात विविध समस्या येण्याची शक्यता असते. घरात अनावश्यक कारणांमुळे कलह निर्माण होतात. आर्थिक समस्या यायला सुरुवात होते. त्यामुळे केरसुणी म्हणजेच झाडू चा उपयोग काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
सकाळच्या वेळी झाडू मारणे हे खूप शुभ मानले जाते. याउलट सायंकाळी सूर्यास्त नंतर घरात झाडू मारणे अशुभ गेले आहे. यामुळे लक्ष्मीमाता नाराज होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी मातेचे आगमन घरात होत नाही. आर्थिक समस्या निर्माण व्हायला लागतात व आवकीचे मार्गदेखील कमी होत असतात .सायंकाळी झाडू मारल्याने हे सर्व परिणाम पाहायला मिळतात.
केरसुणीला / झाडू ला योग्य जागी ठेवण्या संबंधित वास्तुशास्त्रातील काही नियम जाणून घेऊया.
सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे झाडूला कधीही पाय लागू नये अशा जागी ठेवावे.
घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही झाडू ठेवू नये यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनातील आनंदात कमी येत असते. यामुळे घरात वाद विवाद देखील उद्भवू शकतात.
केरसुनी अशा जागी ठेवावी ज्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींच नजर पडत नसेल.
घरातील एखाद्या सदस्य एखादे शुभ काम करण्यासाठी घरातून बाहेर जात असेल तर त्या समोर झाडू मारू नये यामुळे त्यांच्या कार्यात विविध समस्या येऊ शकतात.
सहजासहजी कोणत्याही प्राण्याला मारू नये मात्र विशेषतः झाडूने कोणत्याही प्राण्याला मारू नये यामुळे लक्ष्मीमाता नाराज होत असते.
केरसुणीला कधीही उपाशी ठेवू नये नेहमी आडवी करूनच ठेवावी यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते व कर्जमुक्ती होत असते.
स्वयंपाक घरात कधीही केरसुणी ठेवू नये यामुळे परिवाराला विविध समस्या सहन कराव्या लागत असतात.
घरामधील संडास किंवा बाथरूम यासारख्या जागी वापरलेला झाडू स्वच्छ धुऊन ठेवावा व त्याला घरातील जागेत आणू नये यामुळे घरात तरी जडता येते अशी मान्यता आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)