Home / वास्तूशास्त्र / नशिबाची साथ हवी आहे? करा हे सोपे उपाय या नंतर जीवनात पहा परिवर्तन , मानसीख सुखाचा घ्या आस्वाद श्री.स्वामीं समर्थ ! 

नशिबाची साथ हवी आहे? करा हे सोपे उपाय या नंतर जीवनात पहा परिवर्तन , मानसीख सुखाचा घ्या आस्वाद श्री.स्वामीं समर्थ ! 

नशिबाची साथ हवी आहे? करा हे सोपे उपाय या नंतर जीवनात पहा परिवर्तन , मानसीख सुखाचा घ्या आस्वाद श्री.स्वामीं समर्थ !

 

श्री स्वामी समर्थ मित्रांनो,  आज आम्ही आपल्यासाठी शनी संबंधित काही उपाय घेऊन आलो आहोत. जर आपल्या जीवनात समस्या येत असतील विवाहामध्ये अडचणी येत असतील किंवा घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहत नसल्यास हे उपाय आपण करू शकतो. जर आपले हाती घेतलेले काम पूर्ण होत नसेल अशा वेळी देखील आपण हा उपाय करू शकता.

 

आम्ही दिलेले उपाय आपण महिन्यातील कोणत्याही शनिवारी संपूर्ण दिवसात कधीही करू शकता. प्रत्येक महिन्याला हा उपाय करणे आवश्यक आहे जोपर्यंत आपल्याला उचित ते परिणाम दिसून येत नाही यापुढे आपल्याला मनाची शांती देखील प्राप्त होणार आहे. हे उपाय केल्यानंतर हळूहळू आपल्या जीवनातील समस्या कमी होत जातील. आपल्या जीवनात प्रसन्नता येते.

 

सर्वात आधी घराला स्वच्छ करणे आवश्यक आहे घरात कोणत्या जागी जाडे लागले असेल तर ते काढा व भिंतींवर काही काढलेले असेल किंवा काही लिहिलेले असेल ते योग्य पद्धतीने पुसून स्वच्छ केले पाहिजे. घरातील खिडक्या व दरवाज्याचा बिजागऱ्या मध्ये तेल किंवा ग्रीस लावा.

 

घरात एखादा लिंबाचा दिवा लावावा – एक लिंबू घ्यावा त्याचे  दोन भाग करावे. एक  लिंबाचा  भाग त्यामधून संपूर्ण रस काढून तो आपण खाण्यात देखील वापरू शकतो व उरलेले जे साल असेल तिला उलट करून त्यामध्ये राईचे तेल किंवा सरसोचे तेल यांना प्राथमिकता देऊन हे नसल्यास इतर कोणतेही तेल किंवा तूप टाकून दिवा लावावा. हा दिवा आपल्याला दारा च्या खाली लावा घराबाहेर देखील लावू शकतो किंवा घराच्या आत हि लावला तरी चालते. दिवसातून हा उपाय आपण कधीही करू शकता.

 

घरात असलेली चांगली छायाचित्रे, चांगल्या आठवणींची चित्रे आपण नक्कीच सांभाळून ठेवू शकता मात्र घरातील जुने फोटो जी आपण कदाचित कधी पाहतहि नाही अश्या छायाचित्रांना डिजिटल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावे व उर्वरित इतर रद्दी ही घरा बाहेर काढावे किंवा कोणाला देऊन टाकावी. घरात वीणाकारण असलेली कागदे रद्दी घरातील ऊर्जा थांबवून ठेवतात अशी मान्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात बंद घड्याळ कधीही ठेवू नका  यामुळे आपली प्रगती थांबते.

 

एखादे नारळ, श्रीफळ  घ्यावे. नारळाला हातात घेऊन आपली मनोकामना किंवा भगवंताला आपण प्रार्थना करा की आमच्या वर येणारी संकटे दूर करा आम्ही आपल्यावर विश्वास ठेवत आहोत आमच्या परिवाराची काळजी घ्या व हे नारळ आपल्या देवघरात जाऊन अशा पद्धतीने ठेवावे कि नारळाची  चोटी /जटा आपल्या बाजूला असले पाहिजे  व टोक पुढच्या बाजूला असले पाहिजे म्हणजेच भगवंताकडे.

 

 

24 तासात आपण एकदा पाहू शकता की नारळाला तळा गेला आहे किंवा नाही. जर तळा गेला असेल तर त्याला त्यानंतर घराबाहेर कुठेही किंवा एखाद्या झाडाखाली पुरून द्यावे .तळ नसल्यास तीन दिवसांपर्यंत ठेवावे.तिसऱ्या दिवसानंतर ते नारळ एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या जागी पुरून द्यावे.

 

आपण पशुपक्ष्यांना अन्नदान देखील करू शकता . सर्वात उत्तम म्हणजे मनुष्य सेवा हीच परमेश्वर सेवा याच निमित्ताने आपण गरिबांना खायला देखील देऊ शकता. वरील दिलेले सर्व उपाय सात्विक आहे त्यामुळे यांचे कोणतेही वाईट परिणाम नाहीत. याउलट हे उपाय केल्याने आपल्याला जर मानसिक समाधान मिळत असेल आंतरिक आनंद मिळत असेल तर एकदा नक्कीच करून पहा.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)