मुख्य द्वाराचा समोर ही वस्तू नकोच, असेल तर व्हाल कंगाल…..

मुख्य द्वाराचा समोर ही वस्तू नकोच, असेल तर व्हाल कंगाल…..

 

वास्तुशास्त्र भारताच्या प्राचीन शैली पैकी एक आहे ज्यात व्यक्तीचे जीवन उत्तम व आनंदी कसे राहिल याची माहिती दिली गेली आहे. वास्तुशास्त्रात कोणती गोष्ट कशी हवी या प्रत्येक बाबींची माहिती दिली गेलेली आहे. जर घरात योग्य जागेवर वस्तू ठेवल्या नाहीत तर आपल्या जीवनात समस्या वाढत असतात. यामुळे वस्तू आपल्या योग्य जागेवर असणे आवश्यक असते.

 

ऊर्जेचा प्रवेश आपल्या मुख्य द्वारातून होत असतो. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासमोर काही वस्तूंची असणे आपल्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव टाकत असते. म्हणून दरवाजासमोरील वस्तू नसली पाहिजे. चला तर जाणून घेऊया अशी कोणती वस्तू आहे जी घरासमोर ठेवल्याने वास्तुदोष येत असतो.

 

या वस्तूचे खास लक्ष ठेवा, घरासमोर कुठल्याही प्रकारचा कचरा घाण पाणी नसले पाहिजे. काही लोक कचरापेटी दरवाजा जवळ ठेवत असतात. हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे मानले जाते. घरा-दारा जवळ अस्वच्छता असणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते व तुम्हाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो आणि कर्ज घ्यावे लागू शकते.

 

वास्तुशास्रानुसार घराच्या समोर कधीही दगड जमा करू नये. यामुळे घरातील सदस्यांना यश मिळत नाही. घरासमोर जर काही काम असेल तर काम झाल्यानंतर त्या दगडांना लवकरात लवकर त्या जागेवरून सरकवायला हवे.

 

घरासमोर विजेचा खांब आसने धोकादायक तर आहेच परंतु वास्तुशास्त्रात ही याला योग्य मानले गेलेले नाही. घरासमोर विजेचा खांब असेल व त्या खांबांवर गुंतलेले तार असतील. तर ते जीवनातील समस्यां वाढतात.

 

वास्तु विज्ञानानुसार जर घराच्या मुख्य द्वारा समोरील रस्ता उंच असेल तर योग्य मानले जात नाही. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात उतार-चढाव वाढत राहतो. जीवन समस्यांनी भरलेले असते.

 

 

Leave a comment

Your email address will not be published.