Home / वास्तूशास्त्र / मुलीच्या माहेरातुन घेऊ नका या ५ वस्तू, मुलीचा सौंसार होईल नष्ट माहेरच्या व्यक्तींनी लक्षात ठेवा… 

मुलीच्या माहेरातुन घेऊ नका या ५ वस्तू, मुलीचा सौंसार होईल नष्ट माहेरच्या व्यक्तींनी लक्षात ठेवा… 

मुलीच्या माहेरातुन घेऊ नका या ५ वस्तू, मुलीचा सौंसार होईल नष्ट माहेरच्या व्यक्तींनी लक्षात ठेवा…

 

मित्रांनो हल्लीच्या युगात लग्नामधील हुंडा घेणे अपराध मानले गेले आहे. मात्र काही माता-पित्यांचे आपल्या मुलींमध्ये मुलींवर खूप प्रेम असते व ते त्यांच्यासाठी त्यांच्या जन्मापासूनच काही ना काही वस्तू लग्नानंतर भेट म्हणून देण्याकरिता खरेदी करून ठेवत असतात. व यात काही चुकीचे नाही मात्र काही अशा वस्तू भेट म्हणून देण्याआधी आपण विचार केला पाहिजे यामुळे आपल्या मुलीचा संसार देखील नष्ट होऊ शकतो.

 

वास्तुशास्त्राच्या अनुसार मुलीला लग्नानंतर भेटवस्तू म्हणून चाकू किंवा सूरी सारख्या धारदार वस्तू कधीही देऊ नये. या वस्तूंना नकारात्मकतेचे कारक मानले गेले आहे. यामुळे त्यांच्या संबंधांमध्ये नकारात्मकता येते. मुलीला लग्नानंतर सूरी,चाकू सारख्या धारदार वस्तू भेट म्हणून दिल्यामुळे लग्न झालेल्या दंपत्या मध्ये वादविवाद होत असतात. लहान मोठ्या गोष्टींवरून  मतभेद व्हायला लागतात.  त्यामुळे या सारख्या वस्तू देणे टाळा व आपल्या मुलीच्या जीवन सुखमय करा.

 

मित्रांनो यानंतर दुसरी वस्तू आहे झाडू. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे मुलीला लग्नानंतर हुंड्यांमध्ये झाडू दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी तिच्यासोबत जात असते अशी मान्यता आहे. त्यामुळे झाडू मुलीच्या लग्नात हुंडा म्हणून कधीही देऊ नका.

 

चौथी वस्तू आहे ताळे. घराच्या दरवाजाला लावायचे ताळे मुलीला कधीही लग्नानंतर भेटवस्तू म्हणून देऊ नका. वास्तुशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की मुलीला भेटवस्तू म्हणून टाळे दिल्यामुळे तिचे नशिबाचे ताळेबंद होत असते व मुलीच्या पतीची प्रगती देखील थांबत असते.  त्यांच्या वैवाहिक जीवनात संकटे यायला सुरवात होते. यामुळे अशा वस्तू मुलीला तिच्या लग्नात भेट वस्तू म्हणून देणे  टाळले पाहिजे.

 

मुलीला कधीही  लग्नाच्या हुंड्यात शिवणकामाचे वस्तू म्हणजेच सुई सारखी टोकदार वस्तू देऊ नका. अशी मान्यता आहे की अशा वस्तूंमुळे त्यांचा लग्नामध्ये विघ्न येत असतात. पती-पत्नीमध्ये संबंध मधुर राहत नाही. सासरच्या मंडळी सोबत संबंध मधुर बनवण्यात समस्या येत असतात त्यामुळे हि वस्तूदेखील देऊ नका.

 

मुलीला तिच्या लग्नानंतर भेटवस्तू म्हणून पीठ गाळण्याची चाळणी, पांढरे शुभ्र वस्त्र,साडी, कापड किंवा ड्रेस देऊ नका अशी मान्यता आहे की यामुळे मुलीचे वैवाहिक जीवन बेरंग होत असते व मुलीच्या पतीवर विविध संकटे येत असतात त्यामुळे ही सर्वात मोठी चूक चुकूनही करू नका.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)