या पाच राशीतील व्यक्ती असतात शनी देवांना अधिक प्रिय

वास्तूशास्त्र श्री.स्वामी समर्थ

देव शनिदेव त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी लोक खूप काही उपाय करतात. कारण यांना न्याय देण्याची शक्ती प्राप्त आहे. शनिदेव न्यायाची देवता आहे आणि हे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेव कलियुगाची दैवत आहेत. जी लोक चांगले कर्म करतात त्यांच्यावर ते आपली कृपादृष्टी बनवून ठेवतात आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांना ते दंड देतात.

 

काही राशींतील व्यक्तींवर देव शनिदेव यांची नेहमी कृपा असते. तर आजच्या लेखात आपण पाहूया त्या पाच राशी ज्या शनिदेवांना आहेत अधिक प्रिय!!

 

तूळ : तूळ राशीतील व्यक्ती शनी देवांना अधिक प्रिय असतात. या राशीतले लोक आपले आनंदाने आणि इमानदारीने आपले आयुष्य जगतात. हे व्यक्ती खूपच चांगल्या व्यक्तिमत्वाचे असतात. हे व्यक्ती नेहमी अन्य व्यक्तींची मदत करतात.

 

मकर : या राशीतील व्यक्तींचा स्वामीग्रहही शनी असतो. यामुळेच शनिदेवांची या व्यक्तींवर आपली विशेष कृपा असते. शनिदेव या व्यक्तींवर अनेक प्रकारचे सुख प्रधान करतात. या व्यक्तीनीं नेहमी शनिदेव यांची पूजा-अर्चा केली पाहिजे.

 

सिंह : या राशीतील व्यक्ती खूप मेहनती असतात. हे व्यक्ती गरीब आणि गरजू लोकांची खूप मदत करतात आणि शनिदेवांना असे व्यक्ती खूप प्रिय असतात जे गरीब आणि गरजू व्यक्तींची मदत करतात.

 

मेष : मेष राशीतील व्यक्ती हे जलदरित्या काम करणारे , आशावादी आणि आत्मकेंद्रित व्यक्ती असतात. राशीकेंद्रातील प्रथम राशी असल्या कारणे हे व्यक्ती अधिक भोळे असतात. या राशीतील व्यक्ती आपलं जीवन जिद्द आणि साहसीपणाने जगतात.

 

मिथुन: या राशीतील व्यक्ती आपले निर्णय विचार करून आणि अचूकरीत्या घेतात आणि या व्यक्तींना आपल्या कुटुंबातील आणि जवळच्या लोकांवर अधिक लोभ असतो. हे व्यक्ती कधी कोणाला दुखी करत नाहीत. याकारणाने हे व्यक्ती शनी देव यांना अधिक प्रिय असतात आणि शनी देवांची यांच्यावर विशेष कृपादृष्टी असते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.