Home / वास्तूशास्त्र / वस्तूशास्त्रा नुसार या पाच ठिकाणी बूट-चप्पल घालून कधीही जाऊ नये, होते खूपच अशुभ!

वस्तूशास्त्रा नुसार या पाच ठिकाणी बूट-चप्पल घालून कधीही जाऊ नये, होते खूपच अशुभ!

वस्तूशास्त्रा नुसार या पाच ठिकाणी बूट-चप्पल घालून कधीही जाऊ नये, होते खूपच अशुभ!

कळत नकळत आपल्या हातुन अश्या घटना घडतात की जे वास्तुदोषाचे कारण ठरतात. असे सांगितले जाते वास्तुदोष असल्यावर आर्थिक तंगी, घरात वाद विवाद होत असतात.सोबतच स्वास्थ संबंधी समस्या येत असतात. कळत नकळत आपण अशा ठिकाणी चप्पल-बूट घालून जातो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होत असतात.

वास्तुशास्त्रात पाच अशा जागा सांगितल्या आहेत ज्या ठिकाणी चप्पल-बूट घालून गेल्यावर अशुभ ठरते. या चुकीमुळे लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. चला तर जाणून घेऊया चुकूनही कोणत्या ठिकाणी चप्पल बूट घालू नये.

१)भांडार गृह:- वास्तुशास्त्रानुसार भंडार गृहात बूट-चप्पल घालून कधीही जाऊ नये. या गोष्टीवर लक्ष ठेवल्याने घरात कधीही धान्याची कमी होत नाही.

२)तिजोरी जवळ:- तिजोरी मध्ये काहीही ठेवण्याचा अगोदर बुट-चप्पल काढून गेले पाहिजे. अशी मान्यता आहे की तिजोरी बूट-चप्पल घालून उघडू नये असे केल्याने लक्ष्मीमाता नाराज होते.

३)पवित्र नदी:- वास्तूशास्त्रा नुसार पवित्र नदीच्या ठिकाणी बूट-चप्पल घालून जाऊ नये. नदीत स्नान करते वेळी बूट-चप्पल व चामड्याची घातलेले वस्तू काढणे आवश्यक असते. असे केल्याने घरात सुख शांती राहते.

४)स्वयंपाक गृह:- स्वयंपाक गृहात कधीही बूट-चप्पल घालून जाऊ नये. स्वयंपाक गृहात बूट-चप्पल घालून गेल्यास माता अन्नपूर्ण नाराज होते व जातकांना समस्यांचा सामना करावा लागतो.

५)मंदिर:- हिंदू धर्मात मंदिराला भगवानाचे घर मानले जाते. मंदिरात कधीही बूट-चप्पल घालून जाऊ नये. मंदिरात बूट-चप्पल घालून गेल्यास देवी-देवता नाराज होतात.

वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.