वास्तुदोष दूर करण्यात मदत करते ही वस्तू, जाणून घ्या लाभाकारी उपाय!

वास्तुदोष दूर करण्यात मदत करते ही वस्तू, जाणून घ्या लाभाकारी उपाय!

 

वास्तुशास्त्रानुसार घराचे दोष दूर करण्यासाठी कपूर खूप महत्त्वाचे मानले जाते. कपूरचे काही उपाय जे वास्तुदोष दूर करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

 

वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात वास्तु दोष असतात त्या ठिकाणी कुटुंबात सुख-शांती राहत नाही. वास्तुदोषा मुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते व ती आपल्यासाठी हानीकारक ठरते. नकारात्मकते मुळे व्यक्तीचा भाग्यावर फरक पडते. सोबतच घरातील कुटुंबीयांना सुद्धा समस्यांचा सामना करावा लागतो.

 

वास्तुशास्त्रामध्ये कपूर हे वास्तुदोष नष्ट करण्यासाठी खूपच महत्त्वाचे मानले गेले आहे. कपूरचे असे काही उपाय आहेत जे वास्तुदोष नष्ट करण्यासाठी उपयोगात येतात.

 

जर घरात वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक खोलीत चारही कोपऱ्यांना कपुर ठेवावे. जेव्हा ते कपूर संपेल तेव्हा त्याच ठिकाणी दुसरे कपूर ठेवावे. असे केल्याने घरातील लोकांवर वास्तू दोषाचा प्रभाव पडणार नाही.

 

घरात रोज सकाळ संध्याकाळ कपुराला तुपात बुडवून जाळणे व चारही दिशेला फिरवणे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सोबतच घरात सुख शांती राहते.

 

रात्री घरात स्वयंपाकाचे काम पूर्ण झाल्यावर एका स्वच्छ वाटीत लोंग व कापूर जाळणे लाभदायक मानले जाते. असे केल्याने घरात बरकत राहील व भंडार गृह भरलेले राहील.

 

खूपच वेळा मेहनत केल्यानंतर ही यश मिळत नाही किंवा काम पूर्ण होता होता राहते.तेव्हा वास्तुशास्त्रानुसार वाटीत लोंग व कपूर घेऊन जाळणे व घराच्या सर्व दिशेला फिरवणे.

 

वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

 

 

Leave a comment

Your email address will not be published.