कसे जाणायचे पितृ आपल्या पासून संतापलेले आहेत ?लग्न का होत नाही,जाणून घ्या लाल पुस्तकातील उपाय!
पारंपारिक ज्योतिषात, पितृदोष केवळ कुंडलीत गुरु आणि सूर्य यांच्या स्थानाचा विचार करूनच ठरवला जातो , परंतु लाल पुस्तकामधील जन्मपत्रिकेनुसार, पितृदोशाचे अनेक कारणे आहेत. जर तुमच्या कुंडलीत पितृ दोष किंवा कालसर्प दोष नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असेच का अस्वस्थ आहात? तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत काय? चला त्या लक्षणांमधून जाणून घेऊया.
१) लाल पुस्तकानुसार व्यक्ती आपल्या कर्मा मुळे पितृदोष निर्माण करत असतो. जसे कोणी व्यक्ती पिता जवळ वैर भाव ठेवतात , देवांचा अपमान करतात व मंदिराचा विरोध करतात त्यांना पितृदोष लागत असतो.
२) पिंपळाच्या झाडाला तोडणे किंवा कापणे व पूजेच्या स्थानावर तोडफोड करणे यामुळेही पितृदोष निर्माण होत असतो.
३) आपल्या पितृला सोडणे, कुळ परंपरा त्यागणे कुळ देवतेला त्यागणे व पूर्वजांचा अपमान करणे याने पितृ नाराज होतात.कुळ धर्म व कुळ देवतेला सोडले तर त्याचे नुकसान आपल्याला भोगावे लागते.
४) एखादे अचानक आलेले दुःख किंवा धनाचा आभाव आलेला असतो, तर पितृ दोषा वर विचार करायला हवा.
५) पितृ दोषा मुळे आपल्या सांसारिक जीवनात व आध्यात्मिक जीवनात बाधा येत असतात.
६) जर आपल्याला वाटत असेल की एखादी अदृष्य शक्ती आपल्यावर संकट उत्पन्न करते तर पितृदोशा चा बाधेवर विचार करायला हवा.
७) असे मानले जाते की पितृदोष असला तर आपली प्रगती होत नाही व वेळे वर विवाह होत नाही.
८)एखाद्या निर्दोष पशु, पक्षी किंवा निर्दोष जनावराची हत्या केल्याने देखील पितृदोष लागत असतो.