भाग्य पेक्षा कर्मावर विश्वास ठेवतात या जन्म तारखेचे व्यक्ती,कठीण परिश्रम घेतल्या नंतर होतात धनवान!
मुलांक म्हणजे आपल्या जन्म तारखेची बेरीज. उदा :- एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख १८ आहे तर त्याचा मुलांक हा (१+८) म्हणजे ९ असेल. मुलांक ८ असलेले व्यक्ती कधीही संघर्ष व मेहनत करण्यात असते पुढे..मुलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी हे वर्ष उत्तम आहे.
जर आपला जन्म कोणत्याही महिन्याच्या ८,१७ किंवा २६ तारखेला झाला असेल तर आपला मुलांक ८ मानला जाईल. या मुलांक चे स्वामी ग्रह शनी आहे. कर्मफळ दाता व न्याय चे देवता शनी देव यांचे गुण मुलांक ८ च्या जातकांन मध्ये दिसून येतात. या मुलांकचे अधिकतर लोक परिश्रमी व इमानदार राहतात.
मुलांक ८ असलेली व्यक्ती परिश्रमी व मेहनती असतात व त्यांना काम करणे खूप आवडत असते. काम पूर्ण करण्यात ते कधी मागे पुढे पाहत नाही. यावर्षी मूलांक ८ असलेले व्यक्तींना नात्याचे महत्व समजेल सोबतच त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळही मिळेल.
धनलाभ :- मुलांक 8 असलेल्या व्यक्तींवर कर्ज असेल तर ते या वर्षी कर्ज मुक्त होणार. जून-जुलै महिन्यानंतर ची वेळ यांच्यासाठी आश्चर्यजनक फायदेशीर ठरेल. मुलांक ८ असलेले व्यक्ती या वर्षी जमिनीमध्ये पैसे गुंतवू शकतात.
रोमान्स लाईफ :- मुलांक ८असलेल्या ज्या जातकांचे लग्न झाले नसेल त्यांचे या वर्षी लग्न होण्याची संभावना आहे. मुलांक ८ असलेल्या जातकांचे लग्न झाले असेल त्यांनी आपल्या जीवनात लक्ष देणे आवश्यक आहे. कारण थोडे दुर्लक्ष आपल्या जीवनात समस्या आणू शकते.बोलतांना सांभाळून बोलले पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)