Home / श्री.स्वामी समर्थ / या ५ चुका करणाऱ्या व्यक्तीला महाराज कधीही माफ करत नाहीत, त्यामुळे रहा सावध करू नका ही …

या ५ चुका करणाऱ्या व्यक्तीला महाराज कधीही माफ करत नाहीत, त्यामुळे रहा सावध करू नका ही …

या ५ चुका करणाऱ्या व्यक्तीला महाराज कधीही माफ करत नाहीत, त्यामुळे रहा सावध करू नका ही …

 

 

मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात कधी ना कधी काही ना काही चुकीचे काम नक्कीच करत असतो. इतरांना जरी माहीत नसले तरी आपल्याला स्वतःला माहिती असते की आपण काय काय चुकीचे काम केले आहेत. काही चुका क्षमा करण्याच्या लायकीचे असतात मात्र कही चुकांना कधीही क्षमा मिळत नाही स्वामी त्यांना कधीही माफ करत नाहीत.

 

काही गोष्टी या वाईट परिस्थितीमुळे करत असतात मात्र काही गोष्टी मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी इच्छापूर्वक करत असतो. आणि अश्या चुकांचे परिणाम वाईटच असतात. स्वताच्या स्वार्थासाठी इतर कोणत्याही व्यक्तीला केलेली इजा हे पापच असते. त्यामुळे खाली दिलेल्या पाच मुद्दे लक्षात ठेवून त्या चुका करणे टाळले पाहिजे.

 

 

सर्वात पहिली म्हणजे जो प्राणी किंवा मनुष्य स्वतःच्या बचाव करू शकत नाही त्याला हानी पोहचवीण्याची चूक कधीही करू नका. जम्मू के जानवर असतात त्यांच्यावर कधीही अन्याय करू नका त्यांना मारू नका कारण ते त्यांचा योग्य प्रतिकार करू शकत नाही याचा अर्थ असा फायदा घेणे असा नसतो. किंवा एकटा मनुष्य असेल किंवा लहान बालक असेल त्यांच्यावर हीं संधीचा फायदा घेऊन अन्याय करू नये या चुकीला कुठेही क्षमा नाहीये.

 

परस्त्रीला वाईट नजरेने पाहण्या एवढे मोठे पाप कुठेच नाही. मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितले आहे परस्त्री माते समान याचे आपण पालन केले पाहिजे. इतर कोणत्याही महिलेवर वाईट नजर टाकणे चुकीचे असते त्यामुळे ही चूक करू नका. या चुकी करणाऱ्या व्यक्तीला महाराज कधीही माफ करत नाहीत.

 

तिसरी चुकी म्हणजे इतरांची संपत्ती वाईट मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करणे. मित्रांनो प्रत्येकाला जीवनात पैशाची आवश्यकता असते. दैनंदिन जीवनात पैशाशिवाय कोणतेही काम होत नाहीत मात्र पैशाच्या अधिक लोभ करणे व वाईट मार्गाने पैसा मिळवणे हे देखील मोठे पाप आहे.

 

एखाद्या मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्या सोबत लग्न करणे. हिंदू धर्मात व इतर सर्व धर्मामध्ये महिलेला उच्च स्थान दिले आहे. मात्र समाजात काही वाईट चालीरिती मुळे महिलांचे लवकर किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करून दिले जाते. त्यामुळे विवाह करताना महिलेची इच्छा विचारावी.

 

 

शेवटचे मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला अशी आपले जन्मदाते आई-वडील यांचा वृद्धापकाळात कधीही अपमान करू नका. वैचारिक मतभेद होत असतात मात्र आपल्या भावना शांतपणे व्यक्त करणे आवश्यक आहे. वृद्धापकाळात त्यांना घराबाहेर काढणे या एवढे मोठे पाप कोणतेच नाही. आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे ऋण कधीही फेडले जात नाही तरीही काही व्यक्ती आपल्या आई बाबांची वृद्धापकाळात काळजी घेत नाही ही चुक करने टाळले पाहिजे.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)