१४ जून गणेश चतुर्थीचा दिवशी करा हे उपाय, बदलेल संपुर्ण नशीब!
हिंदू धर्मात आपण सर्वजण जाणतोच, गणपतीला सर्व देवी-देवतांचे प्रथम पूज्य मानले जाते. जर कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा असेल तर प्रथम गणेशाची पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडर नुसार, प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षाची चतुर्थी तारीख विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. यावेळी विनायक चतुर्थी १४ जून २०२१ रोजी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान श्री गणेश यांना समर्पित आहे. या दिवशी विधीनुसार गणेशजी ची पूजा केली जाते.
असे मानले जाते की प्रथम गणेशाची पूजा केल्यास कामात कोणताही अडथळा येत नाही आणि काम यशस्वीरित्या पूर्ण होते. असं म्हणतात की प्रथम गणेशाची पूजा केल्यास सतत यश मिळते.
पार्वती नंदन भगवान गणेश सर्व देवतांमध्ये प्रथम उपासना यांची केली जाते.भगवान गणेशाची पूजा करुन सुरु झालेल्या कोणत्याही कामात अडथळा नाही. म्हणूनच त्याला विघ्नहर्ता म्हणतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्यास घरात नशीब, आनंद आणि समृद्धी येते. याशिवाय विनायक चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यातून आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांपासूनही मुक्तता मिळू शकते. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊया.
विनायक चतुर्थीचा दिवशी करा हे उपाय :-
१) आज कालचे व्यक्ती धनाच्या समस्ये पासून खूपच चिंतीत असतात. प्रत्येक व्यक्ती आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी खूपच प्रयत्न करत असतो परंतु जीवनात खूपच प्रकारच्या आर्थिक समस्या येतच असतात. जर आपल्याला देखील अशा समस्या येत असतील तर आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा जरूर केली पाहिजे व त्यांना आठ मुखी रुद्राक्ष अर्पण केला पाहिजे. असे केल्याने आपल्याला धनलाभ होईल व आर्थिक समस्या दूर होईल.
२) विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांना चौकोनी चांदीचा तुकडा अर्पण करा. जर घरात संपत्तीवरून वाद-विवाद होत असतील तर हा उपाय केल्याने ते दूर होतील.
३) नेहमी पाहिले गेले आहे की कोणता न कोणता व्यक्ती मानसिक तणावात असतो. जर आपणही अधिक मानसिक ताण-तणावात असाल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांना शतावरी अर्पण करा. असे केल्याने मानसिक शांती प्राप्त होते व जीवनात प्रसन्नता येते.
४) दाम्पत्य जीवन चांगले राहण्यासाठी आपण कोणत्याही गणेश मंदिरात जाऊन भगवान गणेश यांना हिरवे रंगाचे वस्त्र अर्पण करा. असे केल्याने दाम्पत्य जीवनातील समस्या दूर होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)