महाराष्ट्राच्या मुलीने दिली जगाला शिकवण, ऑनलाईन क्लासेस साठी नेटवर्क नसल्यामुळे जंगलात बांधली झोपडी, तिथेच सुरू केला अभ्यास, त्यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर PMO ने लावले नेटवर्क!
ऑनलाईन अभ्यास करताना नेट खूप मुळे येणाऱ्या समस्यामुळे महाराष्ट्रातील दरीच्या गावात राहणारी स्वप्नीलने, जंगलाच्या ठिकाणी नेटवक येत होते त्या ठिकाणी अभ्यास करण्याचा निश्चय केला. त्याठिकाणी आपल्या चार भावंडांसोबत मिळून एक लहान झोपडी तयार केली, काही करून त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये. या घटनेतून आपल्याला असे समजते की आपल्यात जर एखादी गोष्ट करण्याची जिद्द असली, तर ती आपण करतोच!
या संबंधित माहिती मिळाल्यावर आयपीएस देव प्रकाश मीना यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट करताना लिहिले ” या आदिवासी मुलीने बारावीची परीक्षा नेटवर्क नसलेल्या गावातून दिलेली आहे. व या पुढील अभ्यासही ऑनलाइन असतात त्यामुळे चार भावंडांनी मिळून अशा जागेवर झोपडी तयार केली जेथे नेटवर्क चांगले होते.
या जागेवरूनच ती पुढील अभ्यास करीत आहेत. सकाळी 7 पासून तर सायंकाळी 7 पर्यंत ह्या जागी बसूनच ते ज्ञानग्रहण करीत आहेत” हे इंग्रजी मधील संवाद आम्ही मराठीत करून सांगितले आहेत! यानंतर हा फोटो खूप व्हायरल झाला. या संबंधित माहिती PMO पर्यंत पोहोचली.
ज्यावेळी या संबंधित माहिती PMO ला मिळाली त्यानंतर फ्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व भारत नेटच्या अधिकारी यांच्या मदतीने तब्बल ६ ते ७ दिवसांच्या आत तेथे इंटरनेट नेटवर्कची सुविधा करण्यात आली जेणेकरून ते सर्व योग्य प्रकारे अभ्यास करू शकतील व सुरक्षितहि राहतील कारण जंगलात अभ्यास करणे हानीकारण ठरू शकते.
यानंतर स्वप्नील आपल्या घरीच राहून योग्य प्रकारे अभ्यास करू शकते आहे. ऑनलाईन क्लासेस मध्ये नेटवर्क की समस्या सुटलेली आहे. हल्ली ती मुंबईच्या एका कॉलेजमध्ये पशुचिकित्सा चा अभ्यास करीत आहे. यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यावरून समजते की जिद्दीने कोणतेही काम केल्याने आपल्यापुढे कितीहि समस्या आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही!