अन्नपूर्णा देवीच्या पूजेने अन्न व पान्यानाची कमी भासत नाही , अशी एक मान्यता आहे कि खूप वर्ष पूर्वी पृथ्वीतला वर अन्न व पाण्याचा तुटवडा झाला होता व त्या वेळेस माता पार्वती यांनी अन्नपूर्णा देवीचा अवतार घेऊन हि समस्येचे निवारण केले होते . ज्या दिवशी माता अन्नपूर्णा ची उत्पत्ती झाली होती तो दिवस मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेचा होता त्यामुळे ,मार्गशीष पौर्णिमा हि अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी केली जाते .
➢ अन्नपूर्णा देवीची पूजा का केली जाते ?
एकेकाळी पृथ्वीतालावर अन्न व पाण्याचा साठा आला होता जनता त्रासून गेली होती व त्यावेळी त्या भगवान ब्रह्म्हां व विष्णू यांची स्तुती करण्यास सुरुवात केली . लोकांची झालेली दुर्दशा बघूम भगवान ब्रह्म्हां आणि विष्णू यांनी महादेवाची आराधना करण्यास सुरुवात केली , महादेवन योगनिद्रेतून जागे केले व या समस्ये बाबत सांगितले. महादेवांनी पृथ्वी चे भ्रमण केले . त्या नंतर माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचे रूप धारण करून पृथ्वीतलावर प्रकट झाले तर भगवान शंकरानी भिक्षु चे रूप धारण केले व माता अन्नपूर्णा कडून भिक्षा घेऊन अण्णा चे वितरण केले . अश्या प्रकारे माता अन्नपूर्णा यांनी या संकट पासून भक्तांचे रक्षण केल , त्या मुळे मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला माता अन्नपूर्णा यांची पूजा केली जाते .
➢ अन्नपूर्णा देवीशी स्थापना कधी केली जाते ?
आपल्या हिंदू संस्कृती अनुसार मुलगी ज्यावेळी लग्न झाल्या नंतर सासरी जाते त्या वेळी आई आपल्या मुलीला तिच्या वैवाहिक जीवनात कधीही अन्न-धान्याची कमी भासू नये म्हणून मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती सोबत देत असते . तर या मूर्तीची स्थापना करण्यासाठी मंगळवार व शुक्रवार हे दोन दिवस शुभ असतात . अन्नपूर्ण मातेची हि पूजा १वर्षातूनन १ वेळेस मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच अन्नपूर्णा जयंतीला किंवा प्रतिमाह पौर्णिमेला हि पूजा केली जाते .
➢ पूजा करण्या ची सामग्री व योग्य पद्धत : –
– सामग्री :- हळदी ,कुंकू ,तांदूळ ,दही , दूध, साखर, मध , तूप (घी), चौरस किंवा पाठ ,रांगोळी ,विळ्याच् पाण
-पूजा करण्याची पद्धत :
सर्व प्रथम पूजा विधी करण्याची जागा व स्वयंपाक घर स्वच्छ करून घ्यावं , व शुद्धीकरण साठी शिंपावे. पूजाविधी करण्याचा जागी किंवा देवघरात चौरस मांडावा , त्यावर स्वच पूजेचे कापड अंथरावे . त्यानं नंतर दीप प्रज्वलित करावा व धूप किंवा अगरबत्ती लावावी . कापड अंथरलेल्या चौरसावर विळ्याचे पाण ठेऊन श्री.गणेशांची स्थापना करावी.
आता अन्नपूर्णा मातेच्या पूजेला सुरुवात करूया . पूजा करण्या आधी अन्नपूर्णा मातेला स्नान व अभिषेख करणे आवश्यक असते . त्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती अभिषेक करण्याचा भांड्यात ठेऊन “ओम अन्नपूर्णा दैवें नमः” या उच्चारण करत दही,दूध,तूप,साखर व मध बनविलेले पंचामृताने देवीला ५ वेळा अभिषेक करावा .त्यानंतर पाण्याने देखील अभिषेक करावा . त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावं.त्यानंतर आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती चौरसावर स्थापन करणार आहोत . त्यासाठी मातेच्या मूर्तीला स्थापनेचा ताटात ठेवण्या आधी त्यात व त्यानंतर मातेची स्थापना करावी .
या नंतर मातेची हळदी -कुंकू लावावा व अक्षदा वाहवा .पुष्पार्पण करावे . त्यानंतर अन्नपूर्णा मातेला दूध साखरेचा नैवैद्य दाखवावा त्या आधी चौरसावर नैवैद्य ठेवण्याच्या जागी पाण्याने चौकोन तयार करावा व त्यावरच नैवैद्याचे भांडे ठेवावे , व मातेला नैवैद्य अर्पण करावे नैवैद्यम समर्पयामीही . मातेला [प्रार्थना करायची आहे ” अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे घाण वैराग्य सिद्धार्थया भिक्षा देवीचं पार्वती “ माता आमच्या घरात सदैव सुच समृद्धी राहू दे कधीही अन्नधान्याची कमी भासू देऊ नको अशी तुझ्या चरणी प्रार्थना . या प्रकारे आपण मातेची पूजा संपन्न करायची आहे. या नंतर आपण आपण आपल्या शेगळीची देखील पूजा करावी .शेगळी समोर रांगोळी ने “अन्नपूर्णा दैव नमः”असे लिहावे, ज्या प्रमाणे मातेला हळदी, कुंकू व पुष्प रुपं केले त्या प्रमाणे शेगडीची देखील पूजा करावी . या पद्धतीने मातेची पूजा संप्पन होईल .