नवी दिल्ली : शेतकरी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्ली येथे गेल्या कित्त्येक दिवसां पासून सुरु आहे . या आंदोलना मागील एकच उद्देश, हा कायदा रद्द व्हावा . या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा करून देखील याचा निष्कर्ष निघाला नसून शेतकरी जास्त संतप्त झाले आहेत .
या आंदोलनाने आज एक वेगळेच वळण घेतले आहे, नव्याने करण्यात आलेले कृषी कायदे ( New agriculture laws) रद्द करण्याचा गेले दोन महिन्या पासून प्रयन्त सुरु आहेत , मात्र आज या प्रजासत्ताक दिनाला आंदोलनाने आक्रमक रूप धारण केले . ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून सर्वोच न्यायालयाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसानी मोर्चा काढण्यास परवानगी दिली हा मोर्चा सुरळीतपणे पार पडावा या द्रीष्टीकोनातून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला , मात्र या नंतर पोलिसांचे बॅरीगेट्स तोडल्या नंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली .
राजपथावरील संचालन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास परवानगी होती मात्र दिल्ली हरियाणा तिरकी बॉर्डर वर शेतकऱ्यांच्या सुरसक्षिते साठी उभारण्यात आलेले बॅरीगेट्स शेतकऱ्यांनी तोडले असून तेथे ट वातावरण निर्माण झाले .
या आंदोलनाचे स्वरूप तीव्र होत असल्या कारणाने पोलिसाना अश्रू गॅस चा वापर करावा लागला मात्र याचा वापर देखील परिस्थिती वर नियंत्रण नाही . त्यांच्यातील काही आंदोलनकार्यानी पोलिसांचा गटा जवळून वेगाने ट्रॅक्टर चालवून विरोध दर्शवला ,तर काही शेतकऱ्यांनी दगडफेक केली असून पोलीस कर्मचाऱ्यांना घायाळ केलं असून पोलिसांनी देखील लाठीचार्जे करून प्रतिउत्तर दिले आहे .शेवटी शेतकऱ्यांनी लालकिल्ला गाठला व तेथे पोहचून आपले विरोध प्रदर्शन केले .