महाराष्ट्राची लेक वडिलांचे कलेक्टर च्या एका सही साठी झालेले हाल पाहून स्वतः झाली कलेक्टर, गरिबांची केली मदत !

महाराष्ट्राची लेक वडिलांचे कलेक्टर च्या एका सही साठी झालेले हाल पाहून स्वतः झाली कलेक्टर, गरिबांची केली मदत !

आपल्या मधून प्रत्येकाला जीवनात कधी न कधी प्रशासकीय कार्यालयात कामानिमित्त जाण्याची वेळ येत असते. एखादे महत्वपूर्ण कागदपत्रे बनविण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या कागदावर सही घेण्या करिता आपल्याला फिरावे लागत असते. काम पूर्ण करून घेण्याकरिता मोठ-मोठे अधिकारांच्या विनवण्या कराव्या लागतात.

 

 

आज जरी संपूर्ण देश डिजिटल होत चालला आहे तरी सुद्धा कही जनतेला या संबंधी माहिती नसते. कही व्यक्ति आजही एखाद्या लहानश्या कामा करिता शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारीत असतात. कमी स्वाक्षरते मुळे अश्या समस्या येत असतात.

 

आज आम्ही अश्याच फेऱ्या मारणाऱ्या व मोठ्या अधिकाऱ्यांच्या विनवण्या करणाऱ्या व्यक्तीची मुलगी रोहिणी भाजीभाकरे यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. यांनी लहानपनीच वडिलांना प्रशासकीय कामात येणाऱ्या समस्या पहिल्या होत्या व त्याच वेळी त्यांनी कलेक्टर व्हायचे स्वप्न पहिले होते व आपल्या वडिलांप्रमाणे इतर लाचार लोकांना मदत करण्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी खूप मेहनत घेऊन आपले हे स्वप्न पूर्ण केले व IAS अधिकारी बनून जाणते समोर एक आदर्श निर्माण केला.

 

सरकारी शाळा व महाविद्यालयातूनच अभ्यास करूनच, उत्तीर्ण झाले UPSC परीक्षा

 

रोहिणी महाराष्ट्रातील  सोलापूर येथील उपलाई नावाच्या एका लहान गावात राहतात. त्यांचे वडील सामान्य शेतकरी होते. रोहिणी यांनी गावात राहूनच दहावीपर्यंतचा अभ्यास केला, यानंतर  इयत्ता बारावी चा अभ्यास करण्याकरता सोलापूर येथे गेले.

 

रोहिणी या लहानपणापासूनच जिज्ञासू व हुशार विद्यार्थीनी होत्या. शालेय परीक्षामध्ये त्या चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होत असत. या मार्कांच्या आधारावर त्याना इजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळाला. इजिनिअरिंग पूर्ण केल्या नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याच व आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यास करायला सुरुवात केली.

 

रोहिणी यांनी परीक्षे साठी स्वतः च्या बळावर अभ्यास करून यश मिळवले आहे असे सूत्रांच्या आधारे समजते. त्यांनी कोणत्याही प्रकारचे कोचिंग व ट्युशन मध्ये प्रवेश घेतला नव्हता. सेल्फ स्टडी करूनच त्या आज IAS झाल्या व इथपर्यंत पोहचल्या आहेत.

 

वडिल्यांच्या समस्या पाहून मिळाली IAS होण्याची प्रेरणा!

 

रोहिणी ज्या वेळी फक्त ९ वर्षाच्या होत्या त्या वेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु केल्या होत्या व त्या योजने साठी रोहिणी चे वडील देखील अर्ज करण्याचा प्रयत्न करीत होते मात्र त्यांना एका सहि साठी बरेच दिवस फिरावे लागले होते. त्यांना कलेक्टर ऑफिसच्या बऱ्याच चकरा माराव्या लागल्या.

 

आपल्या वडिलांकडून ज्यावेळी रोहिणी असे ऐकले की त्यांना कलेक्टर साहेबांचे एका सहीसाठी एवढे फिरावे लागत आहे त्याच वेळी रोहिणी यांनी निश्चय केला की मोठे होऊन ते कलेक्टर होतील व त्यांच्या वडिलां सारख्या लाचार व्यक्तींची त्या मदत करतील. व ते वीस वर्षानंतर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण देखील केले. मन नाडू राज्यातील स्थित सेलम या जिल्ह्यात रोहिणी यांनी १७० पुरुष कलेक्टर नंतर पहिल्या महिला कलेक्टर होऊन इतिहास रचला.

 

IAS अधिकारी होऊन केली जनतेची सेवा

 

रोहिणी त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला कलेक्टर झाल्या होत्या व त्यामुळे त्यांनी महिला सशक्तिकरणावर अधिक लक्ष दिले. त्यांनी आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकले व गरीब व लाचार व्यक्तींची मदत करून वडिलांची इच्छा व स्वतःचे स्वप्न देखील पूर्ण केले.

 

त्यांच्या वडिलांना सरकारी कामांमध्ये आलेल्या समस्या इतर कोणाला येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे व त्यामुळेच या पूर्ण शक्तीने व पूर्ण निष्ठेने आपले कार्य सांभाळत आहेत. कोणत्याही संस्थानाची मदत न घेता कलेक्टर होऊन व समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

 

 

 

Leave a comment

Your email address will not be published.