मनात नकारात्मक विचार येतात जाणून घ्या कोणता करावा उपाय व का येतात नकारात्मक विचार जाणून घ्या !
श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत तो म्हणजे नकारात्मक विचार. प्रत्येकाच्या जीवनात वेळ अशी येत असते ज्या वेळी मनुष्य नकारात्मक विचार करायला लागतो. असे का होत असते, का आपल्या मनात नकारात्मक विचार येतात असा आपण कधी विचार केला आहे का?
चला तर जाणून घेऊया नकारात्मक विचार येण्या मागील मूळ कारण कोणते असते. मित्रांनो नकारात्मक विचार येण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण नक्कीच नकारात्मक गोष्टी पाहिल्या असतील, वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील होय हेच यामागचे मूळ कारण मानले जाते. ज्या वेळी आपण एखादी नकारात्मक गोष्ट पाहतो किंवा एक तो ती गोष्ट आपल्या अवचेतन मनात घर करत असते. कळत नकळत आपल्या मनात देखील नकारात्मक विचार यायला सुरुवात होते.
मित्रांनो प्रश्न असा पडतो की आपण कुठे नकारात्मक गोष्टी पाहतो किंवा ऐकतो तर आपण काही गोष्टी वृत्तपत्रात वाचत असतो काही गोष्टी टीव्हीमध्ये पाहत असतो तर काही व्यक्तींचे नातेवाईक देखील नकारात्मक विचार सरणीचे असतात व त्याचा परिणाम आपल्या विचारसरणीवर देखील होतो. या गोष्टी आपल्या अंतर्मनात बसतात त्यानंतर आपले विचार देखील नकारात्मक होत असतात.
मित्रांनो आपल्याला नकारात्मक विचारांपासून दूर जायचे असेल तर आपल्याला याच्या मुळावर वार करावे लागणार आहे किंबहुना या नकारात्मक विचारांपासून बाहेर पडणे खूप कठीण होऊ शकते. आपल्या अंतर्मनाचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. यावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या मनात घर करणारे विचार हे आपण एखाद्या समजदार व्यक्तीला सांगू शकतो होय ज्याप्रमाणे गोंधळलेल्या अर्जुनाने श्रीकृष्णांना आपली मानसिक अवस्था सांगितली व त्यांनी अर्जुनाला मार्ग दाखवला.
विचार मनात घर करतील त्याआधीच आपण एखादा समजदार व्यक्तीला सांगितले पाहिजे. व त्या संबंधित चर्चा केली पाहिजे यामुळे आपले हृदय मोकळे होत असते व आपल्यातील नकारात्मक विचार देखील कमी व्हायला लागतात . व यानंतरचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या विचारात बदल करायचे असतील तर आपले वाचन, आपण काय पाहतो हे आपल्याला बदलवणे आवश्यक आहे. सकारात्मक गोष्टींचे वाचन करा नवीन नवीन पुस्तके वाचा यामुळे आपले संपूर्ण विचार बदलून जातात.
इंटरनेटवर सकारात्मक गोष्टी पहा चांगली माहिती जाणून घ्या युट्युब वर देखील आपण चांगली माहिती जाणून घेऊ शकता यामुळे आपले विचार सकारात्मक होतात आणि जर विचार सकारात्मक आहे तर कृतीदेखील सकारात्मक होते यामुळे आपण काय पाहतो काय वाचतो काय ऐकतो हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि यावरच आपले आधारित असतात. याचमुळे आपले मित्र देखील चांगले असले पाहिजे. कुसंगतीत राहिल्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला देखील त्यांचा सारखे होत असतो.