या तीन राशींच्या लोकांवर शनिदेवांचा असतो हात….

या तीन राशींच्या लोकांवर शनिदेवांचा असतो हात….

ज्योतिष व नवग्रहा मध्ये शनी ला प्रमुख स्थान आहे. यांना न्यायाचे देवता व कर्माचे कारक म्हटले जाते. असे मानले जाते की शनिदेव ज्यांच्यावर प्रसन्न झालेले असतात ते त्यांना रंका पासून राजा करतात. व ज्यांच्यावर शनि देवांची क्रूर दृष्टी पडली त्यांचा समस्या वाढतात. असे मानले जाते की शनिदेव आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात.चलातर जाणून घेऊया या कोणत्या आहेत तीन राश्या ज्यांच्यावर शनी देवांचा हात असतो.

तुळा :- सर्वात पहिली भाग्यशाली राशी आहे तुळा.ज्यांचे स्वामी शुक्राचार्य आहेत. तुळा राशींच्या लोकांवर शनी देवांची चांगली दृष्टी असते. तूळा राशीं चे व्यक्ती विनम्र स्वभावाचे असतात. या राशीचे व्यक्ती वाद-विवादा पासून दूरच असतात व जीवनात बॅलेन्स बनवून ठेवतात. म्हणूनच या राशीचे चिन्ह देखील तराजूचे आहे. तूळ राशीचे व्यक्ती मेहनतीने व इमानदारीने उदरनिर्वाह करत असतात. या राशींच्या व्यक्तींवर शनिदेव कायम आपली कृपा ठेवत असतात.

कुंभ :- कुंभ राशीच्या व्यक्तींवर ही शनी देवांची चांगली कृपा असते. शनिदेव कुंभ राशीचे स्वामी आहेत. या राशीच्या व्यक्तींना शनी देव नेहमी आपल्या मेहनतीचे फळ देत असतात. यांच्या थोड्या प्रयत्नांनी शनिदेव प्रसन्न होत असतात. असे सांगितले जाते कि कुंभ राशीचे व्यक्ती शांत व समजूतदार स्वभावाचे असतात. या राशींचे व्यक्ती विश्वासू असतात. यामुळे न्यायाचे देवता शनी देव यांच्यावर चांगली कृपा ठेवत असतात.

मकर :- तिसरी राशी मकर आहे जी शनिदेवांची देखील राशी आहे. मकर राशींच्या व्यक्तींवर शनिदेवांचा हात असतो.शनी देव या राशींच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ वेळेवर देत असतात. या राशींच्या लोकांच्या जीवनात आनंदच आनंद असतो. मकर राशीचे व्यक्ती खंबीर व सहनशील असतात. हे मनाच्या विरुद्ध काहीही करत नाही.

वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

Leave a comment

Your email address will not be published.