Home / धार्मिक / श्री. स्वामी समर्थ – गुढी उभारण्यासाठी योग्य पद्धत, एक मंत्र आणि या चुका करण्याचे टाळा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री. स्वामी समर्थ – गुढी उभारण्यासाठी योग्य पद्धत, एक मंत्र आणि या चुका करण्याचे टाळा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री. स्वामी समर्थ – गुढी उभारण्यासाठी योग्य पद्धत, एक मंत्र आणि या चुका करण्याचे टाळा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा पासून सुरू होत असते. गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत आपले  संस्कृत केले जाते .हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र असतो. महापर्व म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस मानला जातो. या दिवशी नवीन संकल्प करून आपले जीवन सूरू करावे. मागील चुकांमधून शिकवण घ्यावी व पुढे चालावे. केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. खूप चांगल्या चांगल्या सवयी लावून नवीन रे सुरुवात करावी

 

 

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. व या दिवसाच्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. व या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते अगदी सूर्योदयापासून आपण गुढी उभारू शकता. मात्र याकरिता आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठावे लागेल आंघोळ वगैरे करून गुढी उभारण्याची तयारी करावी.

 

 

घराच्या मुख्य दारावर झेंडू व आंबाच्या पानांपासून तयार केलेला हार लावावे व सजावट करावी. त्यानंतर वेळूच्या उंच काठीला योग्यप्रकारे धुऊन घ्यावे. या काठीचा एका टोकाला केशरी रंगाची साडी किंवा वस्त्र बांधून घ्यावे. व कडुलिंबाचा पाला बांधावा. व त्यावर पाच गंधाचे चट्टे असलेला कळस ठेवावा. मात्र लक्षात ठेवा तिथे स्वस्तिक काढला गेला पाहिजे. मग यानंतर बांबूवर फुलांची माळ चढवावी. त्यानंतर त्यावर बत्तिशीची माळ चढवावी. यानंतर काही व्यक्ती चूक करतात ती म्हणजे गुढी उभारण्याची दिशा चुकवतात. लक्षात ठेवा मित्रांनो कधीही गुढी उभारताना आपण घरात उभी असताना गुढी उजव्याबाजुला दिसेल या पद्धतीने गुढी उभारावी कोणत्याही इतर दिशेला गुढी उभारणे टाळावे. व गुढी वर बांधत असाल तर हरकत नाही मात्र जमिनीवर कधीही गुढी उभारू नये. गुडी चा बांबू पाठावर उभा करावा.

 

 

 

  मोठमोठ्या शहरांमध्ये जागेची कमतरता असते त्यामुळे काही व्यक्ती आपल्या खिडक्यांमधून गुढी उभारतात तेही चुकीचे नाहीये मात्र आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की गुढी उभारल्यानंतर ती घराच्या आजूबाजूला दिसली पाहिजे. उभारलेला गुढीची हळदीकुंकू ने पूजा करावी. 

 

गुढी उभारल्यानंतर हा महत्वपूर्ण मंत्र बोलावा  :- 

 

!! ओम ब्रह्मध्वजाय नमः !! 

 

हा मंत्र उच्चारण तीन वेळा करावे व गोळीचा नमस्कार करावा योग्य पद्धतीने रांगोळी ची पूजा संपन्न होते.

या नंतर सूर्यास्त होण्यापूर्वी गुढी खाली उतरवावी. सूर्यास्त झाल्यानंतर चुकूनही गुढी ठेवू नये. मित्रांनो या सर्व परंपरांमध्ये खूप मोठे अध्यात्म दडलेले आहे व त्यामधील कारणे देखील महत्त्वपूर्ण आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जीवनावर परिणाम करत असतात.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. 

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)