Home / समाचार / 2021 दहावी बारावीच्या परीक्षा रद्द होणार आहेत का ? पुढे सरकरणार आहेत का?

2021 दहावी बारावीच्या परीक्षा रद्द होणार आहेत का ? पुढे सरकरणार आहेत का?

2021 दहावी बारावीच्या परीक्षा रद्द होणार आहेत का ? पुढे सरकरणार आहेत का?

 

 

दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की नाही हा विद्यार्थ्यांकरीता सर्वात मोठा प्रश्न तयार झाला आहे. एक्झाम झाल्या तर कधी होतील व कशा पद्धतीने होतील हादेखील मोठा प्रश्न. चला तर जाणून घेऊया या संबंधित माहिती.

 

महाराष्ट्र शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बऱ्याच वेळा पासून जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 23 एप्रिल पासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना हा निर्णय काही पटलेला दिसत नाही व त्यामागे परिस्थिती देखील कारणीभूत आहे. Covid-19 च्या वाढत असलेल्या केसेस व त्याचबरोबर बाहेरील वातावरण विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला.

 

मात्र त्यानंतर देखील महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. परीक्षा होणार की नाही होणार किंवा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने होणार यावर कोणतेही स्पष्टीकरण अजून आलेले नाही.परीक्षे संबंधी कोणताही मोठा निर्णय अजून नाही घेण्यात आहे. मात्र covid-19 च्या रुग्णांची वाढती संख्या व ही परिस्थिती पाहता असे समजते परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

 

 

काही काळापूर्वी महाराष्ट्र शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता नाकारली नव्हती मात्र यावर कोणतेही स्पष्टीकरण देखील दिले नव्हते ते असे म्हणाले की” मी यावेळी या संबंधी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही मात्र अंतिम निर्णय काही दिवसांनी जनतेसमोर आणला जाईल ”

 

वर्षा गायकवाड यांनी 6 एप्रिल या दिवशी सहकार्यकर्त्या सोबत या संबंधित चर्चा देखील केली. व यानंतर त्यांनी परीक्षा संबंधित नियमावली जाहीर केली होती सुरक्षिततेची काळजी घेण्याचे नियम त्यांनी स्पष्ट केले होते.

 

आता पर्यत मिळालेल्या माहितीच्या आधारे इयत्ता 9 वी व 11 वी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.मात्र इयत्ता 10वी व 12 वी च्या परीक्षा दिलेल्या वेळापत्रक अनुसार होणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरूच ठेवावा व स्वतःची काळजी घ्यावी. अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नये. वेळोवेळी हात धुणे व हात स्वच्छ ठेवणे गरज नसताना मास्क लावणे या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.